हूल - भालचंद्र नेमाडे | Hool - Bhalchandra Nemade | Marathi Book Review

हूल-भालचंद्र-नेमाडे-Hool-Bhalchandra-Nemade-Marathi-Book-Review
पुस्तक चांगदेव चतुष्टय २ - हूल लेखक भालचंद्र नेमाडे
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या २१४ मूल्यांकन ४.१ | ५

बिढार पुस्तकानंतर "चांगदेव चतुष्टय" पुस्तक मालिकेतला पुढचा भाग म्हणजे "हूल". मागचीच कथा लेखकाने अजून काही पात्रांनिशी पुढे नेली आहे. नवीन गावात, नवी नोकरी स्वीकारून, नवीन उमेदीने आलेला चांगदेव आणि त्याच्या आयुष्यातील हे नवीन पर्व, एक नवीन खंड सुरु झालेला या पुस्तकात मांडला आहे. जुन्या घटनांपासून.. जुन्या लोकांपासून.. दूर पाळणारा चांगदेव पुन्हा एका जाळ्यात अडकतो. ती अडकण्याची गोष्ट मात्र खूपच वेगळी वळणं घेत जाते आणि पुस्तकाची नवीन बाजू समोर येते. ती बाजू अजून किती कंगोरे समोर आणते हे पाहून पुस्तकंही मजा वाढतंच जाते.

एक गोष्ट मात्र मला प्रतिकर्शाने जाणवली, ती म्हणजे नेमाडे यांचं वाचलेलं हे चौथं पुस्तक आहे. आता हळू हळू तोच-तोचपणा जाणवू लागला आहे. पुस्तकातून काही वेळा येणारी निराशा कधी कधी तुम्हला मधेच पुस्तक सोडूही वाटू शकतं. "कोसला" आणि "हिंदू" या पुस्तकांचीच पुनरावृत्ती होतेय का? असं वाटू लागतं.

पुस्तक पुढे जाते ते नवीन विद्यालय .. नवीन सहचारी शिक्षक. पवार सर.. कांबळे, मोडक.. घुले, जोशी, मेहंदळे.. झोपे.. सोबतच विमा वाले.. शारंगपाणी. अश्या अनेक लोकांमध्ये देखील उपरेपणा, पोरकेपण वाटतं राहतो. त्यात पोरींच्या मागे फिरणारा.. मुलींची सतत छेड काढणारा.. "असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही!" हे वाक्य दर दोन वाक्यानिशी टाकणारा गायकवाड मात्र आपल्या मनाचा ताबा घेतो.

एकटेपणाला कंटाळून विकत घेतलेला रेडिओ. पोरींच्या मागे फिरणारं गाव आणि तशीच गावातली माणसं. बिनी.. सावनूर बहिणी.. त्यात हळू हळू प्रेमात पडलेली पारू.. असा एक एक पदर उलगडत जातो आणि कथेला कलाटणी देते. प्रेमाची चाहूल लागते ना लागते तोच एकटेपणा हळू हळू वाढत जातो. पुन्हा नको हे गावही नको वाटते. आणि त्यासाठी नवीन पर्व सुरु होते.. पुन्हा चांगदेव नवीन नोकरीच्या शोधात पुन्हा नवीन मुलाखत.

फिरस्तीवर असणारा असाच एक समदुःखी माणूस.. हूलमनी. त्यात मनात होणारी घालमेल आणि या सर्व पात्रांसोबत होणारे संवाद. आझम लांडे, पाचलेगावकर.. जुना मित्र उत्तम. अशी हळू हळू वाढत जाणारी कथा मात्र मनाला आणि नायकाला विषण्ण करत जाते. त्यातून होणारे परिणाम पुस्तकाला काय नवीन वळणं देते, हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला हे पुस्तक वाचावे लागेल. जर तुम्ही हे पुस्तक वाचलेल असेल, तर आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form