ॲटॉमिक हॅबिट्स - जेम्स क्लियर | Atomic Habits - James Clear | Marathi Book Review

ॲटॉमिक-हॅबिट्स-जेम्स-क्लियर-Atomic-Habits-James-Clear-Marathi-Book-Review
पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स लेखक जेम्स क्लिअर
प्रकाशन मंजुळ पब्लिशिंग हाऊस समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ३०४ मूल्यांकन ४.८ | ५

"सवय"..  हा एक शब्द अनेक गोष्टी आपल्याला सांगून जातो. मग ती सवय चांगली आहे.. की वाईट? हे त्या त्या गोष्टीवरून ठरतं. पण माणूस हा त्याच्या सवयींचा गुलाम आहे, हे मात्र नक्की. आपल्या प्रत्येकाला चांगल्या सवयी टिकवायच्या असतात आणि वाईट सवयी मोडायच्या असतात. पण हे शक्य कसं होईल? जसं की सकाळी लवकर उठायची सवय.. वेळेवर जेवण्याची सवय.. या सवयी आपल्याला लावायच्या असतात. दारू सिगारेट ची सवय.. रात्री बे रात्री जागरणाची सवय.. या सवयी आपल्याला मोडायच्या असतात. मग हे होणार कसं? अनेक प्रयत्न केले तरी आपल्याला त्यात यश येत नाही. त्यामुळे दुसरी कामे देखील बिघडतात. म्हणूनच सवयी जाणून घेण्याची गरज आहे.

जेम्स क्लिअर यांनी यासाठी अटोमिक हॅबिट्स या पुस्तकात.. अशाच प्रकारच्या सवयींचं पृथःकरण केलं आहे.. सवयी लागतात कशा? त्याची प्रक्रिया काय आहे? कशा प्रकारे आपण चांगल्या सवयी लावू शकतो आणि एखादी वाईट सवय कशी मोडू शकतो. याचा अनेक वर्ष अभ्यास करून.. त्याचे परिणाम.. त्याचे अनेक पैलू आपल्यासमोर मांडण्यासाठी हे छान पुस्तक लेखकाने आपल्यासमोर आणले आहे.

अनेक उदाहरणं देऊन लेखकाने सिध्द केलं आहे की.. सवयी कशा मोडता येतात.. कशा लावता येतात.. आपल्या आयुष्यातील लहान लहान बदल त्याला कसे कारणीभूत आहेत. त्याचेच परिणाम होऊन सवयींची साखळी कशी तयार होते. अचानक मोठा बदल घडवणे अवघड आहे.. आणि त्यासाठीच लेखकाने.. छोट्या बदलांची प्रक्रिया सांगितली आहे.. त्याने हळू हळू कसा मोठा बदल होऊ शकतो, हे सांगितले आहे. तुमच्या एका छोट्या सवयीने हळू हळू तुमच्या जीवनाचा प्रवास बदलतो.. तुम्ही जिथे पोहचू शकता त्याहून वेगळ्या ठिकाणी पोहचू शकता. त्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट पद्धत आजमावून पहावी लागेल. कोणत्याही लक्ष्यप्राप्ती पेक्षा नियमित पध्दत कशी योग्य आहे.. प्रभावकारी आहे.. हे लेखकने अनेक मासल्यांनी सिध्द केले आहे.

सोपी भाषा.. त्याला जोड म्हणजे अनेक लहानसहान गोष्टींवर अवलंबून असणारी आणि सिध्द असणारी पध्दत.. त्यांची उदाहरणे.. अनेक सिद्धांत.. आणि त्यातून झालेले बदल आणि पडलेला फरक, आपल्या डोळ्यांसमोर असल्याने हे. पुस्तक आपल्याला फार आवडू लागते. प्रत्येक व्यक्तीला हे पुस्तक वाचणं आवश्यकच आहे. असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामागे कारणही तसच आहे.. कारण अनेक दिवस मनात ठेवलेले सवयींबद्दलचे पूर्वग्रह दूर होतील. आणि नवीन आयुष्याची एक पायाभरणी होईल. यासाठी हे पुस्तक सगळ्यांच्या संग्रही असावे.. आणि काही ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा वाचावे. तुम्ही हे पुस्तक वाचले असेल तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा.. आणि नसेल वाचले तर आत्ताच घेऊन वाचा.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form