वावटळ - व्यंकटेश माडगूळकर | Vavtal - Vyankatesh Madgulakar | Marathi Book Review

वावटळ-व्यंकटेश-माडगूळकर-Vavtal-Vyankatesh-Madgulakar-Marathi-Book-Review
पुस्तक वावटळ लेखक व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ९६ मूल्यांकन ३.९ | ५

एक वादळ.. अनेक घरं! एवढंच... हो तस पाहिलं तर येवढंच. ३० जानेवारी, १९४८ ला गांधीजींच्या मृत्यूनंतर त्याचे महाराष्ट्रात पडलेले पडसाद. त्यांच्या हत्ये मागील प्रमुख "नथुराम गोडसे" हे ब्राह्मण असल्याने, संपुर्ण महाराष्ट्रात ब्राम्हण विरोधी वादळ उठलं. त्यात अनेक घरं जाळली गेली, अनेक गावं उजाड झाली. त्याच वावटळीत अडकलेल्या, होरपळून निघालेल्या एका नायकाची ही कहाणी.

पुस्तकं अगदीच लहान आहे. त्यात मुद्दाही एकच आहे. मग यात वाचावं काय? असा प्रश्न मला पडला होता. पण माडगूळकरांनी जे वर्णन केले आहे.. त्याने अनेक पैलू उघड होतात.. समजतात, त्याचा समकालीन घटनांशी संबंध लक्ष्यात येतो. अनेक गोष्टी समोर येतात. पुस्तकात कोणतीही बाजू बरी-वाईट यावर चर्चा झालीच नाहीये. त्यात फक्त आहे वस्तुस्थिती.  प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.. पण दोन्ही बाजूंनी अलिप्त असुनही काही लोक यात होरपळले गेले त्यांच्यावरच हे एक भाष्य आहे.

व्यंकटेश माडगूळकर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर निसर्ग उभा राहतो. त्याचं चित्र उभा राहतं. अनेक बारकावे समजतात. अनुभवाचं शहाणपण शब्दांनी लिहून, एखादा विषय मांडला जातो. ग्रामीण भागातील अनेक बारकावे पुस्तकात छान टिपले जातात आणि कधी पुस्तकाचं शेवटचं पान हातात आलं कळत देखील नाही.

पुस्तक अगदीच लहान आहे. आवडी निवडीची एक बारीक रेघ मधे ओढली आहे. जर तुम्हाला सत्य घटनेवर काही वाचायला आवडत असेल.. तर नक्कीच वाचू शकता. भाषा आणि लिखाण छान आहे. परंतू घटनेची मर्यादा लेखणीला बांधून ठेवते.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form