पैशाचे मानसशास्त्र - मॉर्गन हाऊजेल | Paishache Manasshastra (The Psychology of Money) - Morgan Housel | Marathi Book Review

पैशाचे-मानसशास्त्र-मॉर्गन-हाऊजेल-The-Psychology-of-Money-Morgan-Housel-Marathi-Book-Review
पुस्तक पैशाचे मानसशास्त्र लेखक मॉर्गन हाऊजेल | जयंत कुलकर्णी
प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या २२४ मूल्यांकन ४.८ | ५

पैसा.. म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक. प्रत्येक वर्गातील व्यक्तीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, कर्ज.. अशा गोष्टी नीट समजून घेऊन त्या संदर्भातील निर्णय, विचारपूर्वक घेतले तर आयुष्यातील अनेक येऊ घातलेले प्रश्न.. चांगले-वाईट अनुभव आपण या पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेऊन, आपल्या जीवनात ते लागू करुन पाहू शकतो. दुसऱ्यांच्या चुका आपल्याला शहाणे करतात.. व त्यांनी केलेल्या बरोबर गोष्टीतून आपल्याला एक पडताळून पाहिलेली योजना आपसूकच मिळते.

प्रत्येक व्यक्तीची पैसे हाताळण्याची पद्धत वेगळी असते.. पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यात भूतकाळातील निर्णय.. चालू घटना.. यांचे देखील अनेक अंशी सहभाग असतात. खरेदी विक्री.. धंद्यातील गणिते.. गुंतवणुकीची व कर्जाची सूत्रे.. यांचे निर्णय आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतात. तीच मानसिकता कशी तयार होते. त्याचे परिणाम दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यातून पुढे होणारा आपला फायदा तोटा हाही अवलंबून असतो. आणि हे सर्व समजून घ्यायचे असेल तर सर्वोत्तम पुस्तक म्हणजे "मॉर्गन हाऊजेल" यांच्या निरिक्षणातून, अनुभवातून सिध्द झालेले "पैशाचे मानसशास्त्र".

पैशासंदर्भातील अनेक अवघड क्लिष्ट संकल्पना लेखकाने अगदी सरळ व सोप्या शब्दात वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामूळे असे पुस्तक वाचताना नेहमी मनाला एका आकस्मित आनंदाची अनुभूती होत राहते. लेखकाने वीस गोष्टींमधून आपल्याला हे धडे दिले आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हळू हळू कशी सुधारणा करू शकतो याची जाणिव आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर नक्की होते. यात कोणताही सल्ला नाहीये.. कोणतीही सूचना नाहीये.. पण तरी देखील लेखकाला काय सांगायचे आहे हे आपल्याला समजते. अनुभवाचे शहाणपण.. किंबहुना.. दुसऱ्याचा अनुभव.. दुसऱ्याचं शहाणपण आपण कसे चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनात वापरू शकतो. याचे हे पुस्तक उत्तम उदाहरण आहे.

प्रत्येकाच्या ठेवणीत असावे, अश्या काहीं पुस्तकांत हे एक पुस्तक नक्की असेल. आताच्या जगात जेव्हा कर्ज काढणे सोपे झाले आहे.. भविष्यातील पैशाचा, वर्तमानात उपभोग घेतला जातोय. अशा काळात तुमच्या आयुष्यात अनेक चिंता.. अनेक संकटं.. अनेक समस्या.. फक्त पैशामुळे तयार होऊ शकतात.. त्यावर जर मात करायची असेल. त्याचे मुळ जाणून घ्यायचे असेल. तर तुम्हाला "पैशाचे मानसशास्त्र" नक्कीच समजून घ्यावे लागेल. तुमचे या पुस्तकाबद्दलचे मत काय आहे, हे आम्हाला नक्की कळवा!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form