पुस्तक | ओंजळीतलं चांदणं | लेखक | पूजा सामंत, सिया सामंत |
---|---|---|---|
प्रकाशन | मानसगंध प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ९० | मूल्यांकन | ३.७ | ५ |
कोणतंही पुस्तक आपण हातात वाचण्यासाठी घेतलं की त्यात आपण आपल्याशी निगडित असू शकणारे अनेक अनुभव आपण शोधू लागतो. आणि हेच अनुभव आपल्याला प्रगल्भ बनवत जात असतात. अनुभव जर मिळते जुळते सापडले तर, ते पुस्तकही नंतर आवडत जातं. असेच एक अनुभवसंपन्न पुस्तक म्हणजे "ओंजळीतलं चांदणं". अनेक प्रकारचे विषय आणि प्रयोगांनी भरलेलं हे पुस्तक आहे. मी तरी स्वतः पाहिलेलं हे अतिशय वेगळ्या धाटणीच पुस्तक आहे. यात ललित कथा आहेत, कविता आहेत, अनुभव वर्णन आहे, आणि तसेच हे पुस्तक मायलेकिने एकत्रितपणे लिहिलेलं आहे. ही या पुस्तकाची खासियत.
प्रत्येक विषय हा अगदी साध्या सोप्या आणि आपल्या रोजच्या भाषेत लेखिकेने अगदी सहज करून सांगितलं आहे त्यामुळे तो आपल्या सर्वसामान्य माणसांच्या अंगवळणी पडतो अस मला वाटतं. या पुस्तकाचे लहान लहान सहा भाग आहेत.. लालितगंध, पावलापुरता प्रकाश, पात्रपत्र, कथासूक्त, काव्यधारा आणि सियाच्या लेखणीतून. आणि या प्रत्येक विषयाला अनुसरून त्यात सुंदर लिखाण केले गेले आहे.
अनेक पुस्तकं आपल्याला गुंतवून जातात, याही पुस्तकाचं मुखपृष्ठ अगदी तसंच आहे. त्यातील हातातून शब्दरूपी चांदण्या दुसऱ्या हातात पडताना, आपल्याही मनाला सुखावत जातील यात शंका नाही. यातून नवनवीन गोष्टी तुमच्या भेटीला येतील हे नक्की.
यातील अनेक लेख अनेक कथा वृत्तपत्रांमधून आधी देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत. तुम्ही पूजा सामंत यांना अनेक मासिकातून देखिल वाचलं असेलच. त्यांची सहजतेने वैचारिक विषय उलघडून सांगण्याची शैली कमालीची आहे. हे पुस्तक तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी वाचू शकता असं आहे. लहान कथा, कविता आणि वेग वेगळे विषय आपल्याला हवे तेंव्हा निवडता येतात. प्रवासात किंवा अचानक मिळणाऱ्या थोड्याशा वेळात वाचण्यासाठी हे पुस्तकं एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही आधी हे पुस्तक वाचलं असेल तर आम्हाला नक्की तुमची प्रतक्रिया नक्की कळवा.