पुस्तक | जंगलाची दुनिया | लेखक | मारुती चितमपल्ली |
---|---|---|---|
प्रकाशन | साहित्य प्रसार केंद्र | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ५६ | मूल्यांकन | ३.७ | ५ |
मारुती चितमपल्ली आणि त्यांचं जांगलाशी नातं, निसर्गाशी असणारी नाळ, सर्वांनाच माहित आहे. सर्वप्रचलित आहे. इतक्या बरकाव्याने निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या लोकांमधे त्यांची गणती होते. त्यांनी अनेक ठिकाणी वनाधिकारी म्हणून काम केले आहे. झाडं, वेली, पशु, पक्षी, डोह, तलाव, अभयारण्य अश्या अनेक प्रकारच्या निसर्गाच्या अंगांचा अभ्यास करून त्यांनी त्यांची अनेक पुस्तकं लिहिली आहेत.
मी याआधी नमूद केलेल्या "जंगलाचं देणं" या पुस्तकात त्यांच्या निरीक्षणाबद्दल अधिक बरकव्याने बोललो आहेच. या पुस्तकांत त्यांनी आपण जंगलाची दुनिया कशी अनुभवू शकतो त्याची उकल केली आहे. ती दुनिया आपल्याला पाहण्यासाठी काय काय पापड लाटावे लागतात याचा अंदाज तुम्हाला येईल. पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण हे दोन्ही कसे वेग वेगळाले भाग आहेत हे त्यांनी सांगितलं आहे, आणि त्यासाठी अवश्यक असणारी सर्व माहिती त्यांनी या पुस्तकात दिली आहे.
प्राणी निरीक्षण हे पक्षी निरीक्षणाहून कैक पटीने अवघड आहे. पक्षी सर्वत्र आढळतात पण प्राणी मात्र एकच ठिकाणी फारसे राहत नाहीत. आणि त्यांचा धोका देखील आहे. आपण हे कौशल्य कसं आत्मसात करू शकतो याची देखिल या पुस्तकात त्यांनी इत्यंभूत महिती सांगितली आहे. तसे पाहायला गेले तर हे फक्त ५६ पानांचं अगदी छोटेखानी पुस्तक आहे, पण यातून मिळणारी माहिती मात्र लाख मोलाची आहे.
निसर्ग प्रेमींनी तर नक्कीच पुस्तक वाचावं, पण नवीन लोकांसाठी किंवा नवीन वाचकांसाठी सुधा हे पुस्तकं पर्वणीच आहे. अगदी लहान त्यात.. सुंदर असे छायाचित्रं आणि तसेच मनमोहक लिखाण यामुळे हे पुस्तक अगदी छान झालं आहे. यात काही कथा देखील त्यांनी गुंफल्या आहे. त्यांनी हे पुस्तक सुरेख होतं! तुम्ही वाचलं असेल तर तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.