आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे | Amchya Ayushyatil Kahi Athavani - Ramabai Ranade | Marathi Book Review

आमच्या-आयुष्यातील-काही-आठवणी-रमाबाई-रानडे-Amchya-Ayushyatil-Kahi-Athavani-Ramabai-Ranade-Marathi-Book-Review
पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे
प्रकाशन वरदा प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या २७२ मूल्यांकन ४.४ | ५

एकोणिसाव्या शतकात भारतात होऊन गेलेल्या काही अतिशय महत्वाच्या आणि असामान्य स्त्रियांच्या यादीत "श्रीमती रमाबाई रानडे" यांचे नाव अग्रस्थानी आहे. भारतात स्त्रीशिक्षण हा जेव्हा गुन्हा मानला जात असे, त्या काळातील हे पुस्तक आहे, आणि त्याच काळातील काही आठवणींनी अंमळ भरलेले हे पुस्तक एका स्त्रीचा गौरव आहे. आणि आपसूकच तिच्या प्रगतीची वाटचाल असलेला एक अंक आहे. "उंच माझा झोका" या मालिकेने मराठी माणसांच्या घराघरांत पोहचलेल्या रमाबाई खऱ्या अर्थाने कशा होत्या, त्यांची शैक्षणिक वाटचाल कशी सुरू झाली याची इत्यंभूत माहिती या पुस्तकात आहे.

"न्यायमूर्ती महादेव रानडे" हे त्या कालखंडातील अनेक समाजकल्याण पर चळवळींचे जनक. त्यासोबतच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातही त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. आणि याच त्यांच्या कर्मठ आणि सशक्त विचारांच्या आधारे, त्यांनी स्त्री सबलीकरण यासाठी अत्यावश्यक असलेल्या शिक्षणावर स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या पत्नीपासून सुरावात केली. त्या काळातील हि घटना अत्यंत समाजविरोधी होती. लेखिकेने आपल्या आत्मचरित्रात कौटुंबिक वातावरण, सामजिक घटना आणि आपल्या पतीशी असलेल्या आगळ्या वेगळ्या नात्यावर आणि अनेक आठवणींवर भाष्य केलं आहे.

यात रमाबाई लहानपणी कशा अल्लड होत्या, मात्र हळू हळू त्यांच्यातील झालेला सुप्त बदल.. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची एक नाजूक व सुंदर कहाणी आहे तुम्हाला या पुस्तकात अगदी अडकवून ठेवील. त्याचसोबत आपल्याला न्यायमूर्तींच्या देखील अनेक गुणांचे, स्वभावाचे, वागणुकीचे आणि कर्तृत्वाचे बारकावे यातून स्पष्ट दिसून येतात. एका असामान्य स्त्रीची मातब्बरी आणि कर्तृत्ववान नायकाची ही कहाणी वाचली की नक्कीच आयुष्याला स्फुरण चढते. अनेक गोष्टी यातून शिकता येतातच परंतु विपरीत परीस्थित कसे वागावे.. कसे शांत रहावे.. आणि कसे आपलं काम तडीस न्यावे याची अनेक उदाहरणं यातून तुम्हाला मिळतील. प्रत्येकाने नक्की वाचावे असे पुस्तक.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form