हू मूव्हड् माय चीज? - स्पेन्सर जॉन्सन | Who Moved My Cheese? - Spencer Johnson | Marathi Book Review

हू-मूव्हड्-माय-चीज-स्पेन्सर-जॉन्सन-Who-Moved-My-Cheese-Spencer-Johnson-Marathi-Book-Reviews
पुस्तक हू मूव्हड् माय चीज? लेखक डॉ. स्पेन्सर जॉन्सन, एम. डी.
प्रकाशन मंजुळ पब्लिशिंग हाऊस समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ९१ मूल्यांकन ४.७  | ५

बदल कोणाला आवडतो?? मला तर बिलकुल आवडतं नाही. परंतु तो होतच असतो, आपल्याला त्यासोबत बदलावच लागतं. आणि आपण नाही बदललो, तर मात्र आपल्या नकळत अनेक गोष्टी पुढे निघून जातात, आणि आपल्याला फक्त पश्चाताप होतो. आणि तो नसेल होऊ द्यायचा तर हे पुस्तक एकदा नक्की वाचयला हवे. आयुष्यात होणाऱ्या बदलांची उजळणी करून, त्यातून शक्य ते शिकून आपण कसे पुढे जायला हवे याबाबत या पुस्तकांत अगदीं उत्तम शब्दात सांगितले आहे.

माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयांवर जर त्याला ताबा मिलाबायचा असेल, तर त्याला तसे बदल आपल्या वागणुकीत घडवून आणावे लागतात. ते बदल घडवताना होणारा त्रास थोडे दिवस नकोसा वाटत असला तरी तो आपल्याला शर्यतीत टिकून ठेवतो. जर आपण होणारे बदल दुर्लक्षित करत गेलो, त्यानुसार स्वतः विचार करून वेळोवेळी स्वतःला कार्यक्षम बनवलं नाही तर मात्र पुढील आयुष्यात होणार त्रास किंवा अडचणी खूप मोठ्या असतील. अशा बदलाच्या संपूर्ण प्रक्रियेची हे पुस्तक एक उत्तम वाट आपल्याला दाखवतं.

या पुस्तकांत काही मित्र जमून गप्पा मारत असतात, आणि त्यातील एक मित्र एक छान गोष्ट सांगतो. गोष्टीत दोन माणसं असतात हेम आणि व्हा, आणि उंदरं स्निफ आणि स्करी. त्यांच्यावरच ही संपुर्ण गोष्ट अवलंबून आहे. त्यांना चौघांनाही एकच गोष्ट आवडतं असते, आणि ती म्हणजे चीज. आणि याच गोष्टीचा आधार घेऊन लेखकाने ही बदलाची प्रक्रिया मांडली आहे आणि त्याला आपण कशी प्रतिक्रिया देतो, माणसाची मानसिकता कशी असते याच चित्र उभं केलं आहे. यातूनच बदल आणि त्यासोबत घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी लेखकाने आपल्या समोर आधी मांडून नंतर त्याच सविस्तर चर्चेच्या स्वरूपात अजूनच नीट समजावून सांगितली आहे.

हे पुस्तक वाचून तुम्हाला अनेक गोष्टी हाती लागणार आहेत, म्हणून मला वाटतं तुम्ही हे नक्की वाचलं पाहिजे, आणि सोबतच सर्वांना सांगायला ही हरकत नाही. प्रत्येकाच्या संग्रही असावं अस हे पुस्तक आहे. कोणालाही भेट देऊ शकू इतकं छान पुस्तक आहे. यातील लेखकाने लिहिलेले साधे पण तितकेच महत्त्वाचे आणि मोलाचे शब्द तुम्हाला आवडतील. तसेच त्यातील साध्या साध्या पद्धतीने मांडलेले बारीक बदल, सूक्ष्म तत्वज्ञान या पुस्तकाची जमेची बाजू आहे.

ज्यांना कोणाला सेल्फ हेल्प पुस्तकं आवडतं असतील, स्वतःत चांगले बदल घडवून आणायचे असतील, स्वतःची भिती दूर करायची आहे, हे पुस्तक त्यांच्यासाठी, एक उत्तम नमुना आहे असे मला वाटते. हे पुस्तक मला आवडलं आहेच, तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form