टाटायन - गिरीश कुबेर | Tatayan - Girish Kuber | Marathi Book Review

टाटायन-गिरीश-कुबेर-Tatayan-Girish-Kuber-Marathi-Book-Reviews
पुस्तक टाटायन लेखक गिरीश कुबेर
प्रकाशन राजहंस प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ४२० मूल्यांकन ४.७  | ५

भारताच्या व्यावसायिक आणि सामजिक जडणघडणीत ज्या एक-दोन व्यक्तींचा किंवा घराण्यांचा समावेश असू शकेल. त्यात "टाटा" हे नाव अग्रेसर आहे. आपल्या सर्वांच्याच कानावर हे नाव अनेकदा आलं असेल. अनेकदा आपण त्यावर अल्पसं वाचलं देखील असेल. पण तेवढ्यात हे संपत नाही. त्या नावाचा विस्तार अफाट आहे.. अविश्वसनीय आहे आणि अमर्यादित आहे. टाटांच्या अनेक पिढ्यांनी देशसेवा केली आहे. व्यवसायात टीसीएस सारख्या आयटी कंपनीपासून ते आत्ता आताच्या नवनविन इलेक्ट्रिक मोटर पर्यंत.. घड्याळापासून ते अलांकारांपर्यंत... कपड्यांपासून ते स्टील पर्यंत.. असा दाही दिशांना असणारा व्यवसायाचा विस्तार हीच ओळख आपल्या सर्वांना माहिती असेलच आणि माहिती नसेल किंवा विस्तृत महिती हवी असेल तर "गिरीश कुबेर" लिखित "टाटायन" हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.

या पुस्तकांत टाटा घराण्याचा विस्तृत इतिहास लेखकाने अगदी चपखल मांडला आहे. अगदी सुरवातीच्या काळातील मुंबई मधल्या वाईट दिवसात कष्टाने वाढवलेला व्यवसाय ते आता आताच्या नवनवीन घटनांचा मागोवा घेत हे पुस्तकं पुढे जात राहत. रतन टाटा.. सायरस मिस्त्री.. जमशेदजी टाटा... नुसरेवानजी टाटा.. अशी अवाढव्य व्याप्ती असलेलं हे कुटुंब. लेखकाने आपल्या लेखणीतून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात लेखकाला अगदी सुरेख यश आलं आहे. टाटा कुटुंबाची भारताच्या जडणडणीमध्ये असलेली मोलाची मदत आणि मार्गदर्शन या पुस्तकातून उलघडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

अगदी स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून.. झालेल्या घटनांचा आढावा.. हळू हळू होणारे बदल.. उद्योग जगतात होणारे बदल आणि त्याला अनुसरून होणारे संदर्भ लेखकाने सुंदर प्रकारे नमूद केलेले आढळतात. त्यातून आपल्याला व्यवसायाची व्याप्ती.. हळू हळू नवनवीन तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या प्रयोगांनी बदलणारी रूपरेषा या पुस्तकातून आपल्याला दिसून येते. त्यात असणारा टाटा कुटुंबाचा मोलाचा वाटा, आणि इतर अनेक गोष्टींचा खुलासा तुम्हाला हे पुस्तक वाचताना होत राहील.

प्रत्येकाने वाचावं अस हे पुस्तक आहे. टाटा समूहाच्या वाटचालीत आणि समकालीन राजकीय घटनांचे पडलेले पडसाद.. त्यातून जन्माला येणारा संघर्ष आणि संघर्षाची ठिणगी होऊन पूर्ण देशात बदल घडवून आणणाऱ्या अशा अनेक स्मृतींची माळ गिरीश कुबेर यांनी अगदी चपखल ओवली आहे. प्रत्येक नवीन व्यवसायाच्या मागील कथा.. त्यामागचे विचार.. त्यात उद्भवलेल्या अडचणी.. त्यावर केलेले उपाय.. त्याचा निष्कर्ष.. आणि त्याची समाजात.. देशात.. आणि आर्थिक जगात झालेली वाटचाल या पुस्तकात आपल्याला खेळवून ठेवते. टाटा यांच्या कुटुंबाची कधीही आठवण झाली तरी मला एक कविता आठवते.. सावरकरांनी आपल्या वहिनीला पत्रातून जी गजेंद्रमोक्षाची कविता पाठवली होती ती,

अनेक फुले फुलती । फुलोनिया सुकोनी जाती ।

कोणी तयांची महती गणती । ठेविली असे ।।

परी जे गजेन्द्रशुंडे उपटिले । श्रीहरीचरणी अर्पण केले ।

कमलपुष्प ते अमर ठेले । मोक्षदायी पावन ।।

अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।

दिगंती पसरे सुगंधिता । लोकहित परिमलाची ।।

सर्वांनी आवर्जून विकत घेऊन वाचावं असं हे पुस्तक आहे. तुमच्या उद्योगातील.. व्यवसायातील.. अनेक समस्यांसाठी आणि त्यावरच्या उपायांसाठी तुम्ही या पुस्तकातून प्रेरणा घेऊ शकता. मला अतिशय आवडलेल्या पुस्तकांपैकी हे एक आहे. तुम्ही देखील हे पुस्तकं वाचून तुमचं मत आम्हाला कळवा.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form