कोसला - भालचंद्र नेमाडे | Kosala - Bhalchandra Nemade | Marathi Book Review

कोसला-भालचंद्र-नेमाडे-Kosala-Bhalchandra-Nemade-Marathi-Book-Reviews
पुस्तक कोसला लेखक भालचंद्र नेमाडे
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ३३४ मूल्यांकन .९ | ५

प्रत्येकाला आपल्या दोन बाजू असतात... एक जी आपण सगळ्यांसमोर मांडतो आणि एक जी फक्त आपल्या पुरतीच असते. स्वतःच्या स्वतंत्र विचरांची आणि स्वतःशीच भांडत स्वतःच्या मनात कालवा-कालव करणारी, जिथं आपण सतत वावरत असतो. दोन्ही ही खूप जरुरी बाबी आहेत. आणि हेच त्याच्या स्वभावाचं गमक असते. या पुस्तकात असेच मुक्त जगलेल्या एका तरुणाचा विचारी संघर्ष आहे.

पुण्यास शिक्षणासाठी, एका इवल्याशा गावातून आलेल्या नायकाची ही द्विधा मनस्थिती आहे. आपल्याला या रहदारीच्या शहरात काहीही उमगत नाही, आपण अगदीच वेगळे आहोत, सारं जग निराळं आहे अशाच स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत कोशात बंद केलेल्या एका सुंदर फुलपाखराची ही गोष्ट आहे. त्याच कोशात आयुष्य घालवून मनात घोळणाऱ्या वेगवेगळया विचारांचा हा संघर्ष आहे. त्यातून घरातील वातावरण आणि व्यवहार यामुळे थोडासा बुजलेला नायक. मनाला घोर लावतो. समाजाचं प्रतिबिंब असलेल्या या पुस्तकाची नक्कीच अनेकांनी दखल घेतली आहे आणि आपण सर्वही नक्कीच घ्या.

भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या वयाच्या पंचविशीत लीहलेल्या या पुस्तकद्वारे समाजाचं एक वेगळं रूप पहायला मिळतं. तसेच नायकाच्या मनावर या सर्व घडामोडींनी होणाऱ्या प्रचंड तणावाचा, एका वेगळ्या आवरणाचा आढावा घेतला आहे. लेखकाची शैली वेगळी आहे, भाषा प्रभुत्व प्रचंड आहे, परखड शब्द आहेत तसेच विषय हाताळणी तुम्हाला विचार करायला भाग पाडते.

पुस्तकातील घटनाकाळ, त्यावेळीं समाजाने निर्माण केलेली व्यवस्था आणि घरातील गरीब परिस्थिती लेखकाने अगदी विशेष मांडली आहे. मनात सतत न्यूनगंड बाळगून असणाऱ्या लोकांसाठी ही कादंबरी नक्कीच एक मैलाचा दगड आहे. नायकाच्या घरात आजारी असलेल्या मनीच्या वर्णनाने तर नक्कीच डोळ्यांच्या काचेतून निखळ पाण्याला वाव आहे, हे दाखवून दिले आहे. तिच्या अंगावरच्या प्रत्येक फोडानिशी आपलीही लाही-लाही होतेलेखकाने मनात तेवत्या पणतीचे, अगदी मोठ्या धगधगत्या ज्योतीमध्ये रूपांतर केले आहे.

परगावी शिकणाऱ्या, कामासाठी बाहेर आलेल्या, गावातून दूर राहणाऱ्या, आपला "Comfort Zone" सोडून वावरणाऱ्या आणि आकाश गवसू पाहणाऱ्या पाखारांसाठी, त्यांच्या एका सहपाखराची ही कहाणी नक्की वाचावी अशी लेखकाने लिहली आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल याची खात्री देतो.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form