एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर | Ek Hota Carver - Veena Gavankar | Marathi Book Review

एक-होता-कार्व्हर-वीणा-गवाणकर-Ek-Hota-Carver-Veena-Gavankar-Marathi-Book-Reviews
पुस्तक एक होता कार्व्हर लेखिका वीणा गवाणकर
प्रकाशन राजहंस प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १८४ मूल्यांकन .८ | ५

जागच्या पाठीवर जगणाऱ्या प्रत्येकास जस हवं तस जगायला मिळतं का? आणि ज्यांना मिळतं त्यांना त्याची किंमत आहे का? "दात आहेत तर चणे नाहीत, आणि चणे आहेत तर दात गायब" याचप्रमाणे सर्वांच्या आयुष्यात काही ना काही विरोधाभास म्हणा किंवा कमतरता ही असतेच. काही लोक म्हणतील यालाच तर आयुष्य म्हणतात ना? हो अगदी खरंय... पण हेच जर मानवनिर्मित असेल तर? माणसानेच दुसऱ्यास जखडून ठेवायचा प्रयत्न केला असेल तर? आपणच जर लोकांना कमी लेखत असेल तर? असे अनेक प्रश्न, विविध विचार आणि नवनवीन दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे.

वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या "
एक होता कार्व्हर" या पुस्तकात अगदीं तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकू येत राहतो. सतत जगातील कटू सत्याची जाणिव म्हणा, किंवा दर्शन म्हणा.. हे पुस्तक तुम्हाला देत राहते. लेखिकेने पुस्तकास नक्कीच आजुन उच्च स्तरावर नेलेले आहे. लेखिकेने हे पुस्तक उत्कृष्ट लिहिलं आहे आणि त्याने पुस्तकाचा मूळ गाभा अजून खुलवण्याचा प्रयत्न सफल करून दाखवला आहे. मी म्हणेन लेखिका नक्कीच पुस्तकास न्याय मिळवून देते.  

एक अमेरिकी निग्रो माणूस, ज्याचा जन्म खर तर गुलाम बनून लोकांची सेवा करण्यासाठी झाला होता, त्याने स्वबळावर आपल्या जिज्ञासू वृत्तीने, चिकाटी दाखवून सगळ्यांना अवाक् करणाऱ्या काही गोष्टी कशा केल्या, याची कौतुकास्पद गोष्ट म्हणजे हे पुस्तक आहे. आणि फक्त एकच नाही तर सर्व क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामांची यादी आपल्याला निशब्द करून टाकते. वर्णभेद हा त्या काळातील अमेरिकन लोकांमधील एक खूप मोठा आणि लाजिरवाणा प्रकार होता. कृष्णवर्णीय लोकांना तिथं खालचा दर्जा दिला जात असे, अशातच एका लहानशा मुलाचा एक डोळे विस्फारून टाकणारा सौम्य लढा. तुमच्या हृदयावर बराच खोल घाव करून जातो. नशिबात लिहलेले सगळं तुम्ही बदलू शकता, तुम्ही तुमच्या स्वतचं जीवन हवं तसंच जगू शकता याच एक उत्तम उदाहरण म्हणजे "जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर" आणि त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंच दर्शन लेखिकेने करून दिले आहे.

हे पुस्तक तुम्हाला 
सन्मानानं जगायला शिकवेल, जीवन आत्मज्ञानानं सजवायला शिकवेल, हसत खेळत रंगवायला शिकवेल आणि त्याचा आनंद अगदी मोठ्या मनानं लुटायला तर शिकवेलच, पण त्याहूनही तो दुसऱ्यांच्या वाट्याला यावा यासाठी लढायला देखील शिकवेल. मला वाटतं हे पुस्तक एक समजाच्या विषमतावादी विचारांच्या गर्तेत एक मैलाचा दगड आहे. सर्वांनी नक्कीच वाचावं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या मागील मुद्दा मनात एक हुरहूर नक्कीच लावण्यात यशस्वी होतो अस म्हणावं लागेल.
"अधिकाधिक उपभोगाच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषीसंसकृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे."

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form