चांदणवेल - बा. भ. बोरकर | Chandanvel - Ba. Bha. Borkar | Marathi Book Review

चांदणवेल-बा-भ-बोरकर-Chandanvel-Ba-Bha-Borkar-Marathi-Book-Reviews
पुस्तक चांदणवेल लेखक बा. भ. बोरकर
प्रकाशन कॉन्टिनेन्टल प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १३४ मूल्यांकन ४.५ / ५

बाळकृष्ण भगवंत बोरकर, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे आवडते "बाकी" त्यांचा हा अतिशय सुंदर आणि खूप सुंदर असा कविता संग्रह. यातील अनेक कविता गोव्याच्या भूमीत फुललेल्या निसर्गावर आहेत तर बोरकरांच्या शुद्ध मराठीची आणि महाराष्ट्राच्या भाषेचा गोडवा सांगणारी गिते यातून तुम्हाला ऐकायला मिळतील. बोरकरांच्या कवितेवर महात्मा गांधींचा प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. स्त्री ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट असे बोरकर म्हणायचे आणि त्याची प्रचिती आपल्याला त्यांच्या कवितेच्या ओळी ओलिमधून येते. बोरकरांच्या कविता.. एका विशेष ढंगाला धरून नाहीतच. म्हणून आपल्याला आपल्या वेगळ्या धुंदी प्रमाणे त्या वाचाव्या लागतात.
 
"जपानी रमलाची रात्र" या कवितेतून आपल्याला अंदाज येऊ शकेल की कोणतीही गोष्ट बोरकर किती मनापासून लिहीत होते आणि सोबतच "रसलंपट मी, तरी मज अवचित गोसावीपण भेटे" असे जेंव्हा बोरकर म्हणतात तेंव्हाच त्यातील दोन्ही बाजू आपल्याला दिसतात. मी रस लंपट आहे.. मला हाव आहे.. हव्यास आहे.. पण मला अचानक गोसावीपण भेटते यातून त्यांची कल्पना आपल्याला समजू शकते. आणि अशाच अनेक कवितांनी की चांदणवेल लखडलेली आहे, बहरली आहे. मला आवडलेल्या काही कविता मी खाली ओळीने सांगतो. त्या तुम्ही वाचल्या नसतील तर वेळ काढून नक्की वाचा अस मला वाटतं.
 
तेथे कर माझे जुळती, मुशाफिरा, जलद भरूनि आले, बांगड्या, भिडली रात्र पहाटे, तव नयनांचे दल, रुमडाला सुम आले ग, माझे घर, मज लोभस हा इहलोक हवा, जीवन त्यांना कळले हो, डाळिंबाची डहाळीशी, सरिवर सरी, चालले उंट कोठे?, हळद लाऊनी आले उन, तू गेल्यावर, आणि दोन अभंग.
 
या वरती दिलेल्या कविता कमीत कमी १५-२० वेळा तरी मी नक्कीच वाचल्या असतील आणि तरीही त्या सुदंर वाटतात, आणि उलट जितक्या जास्ती वेळा वाचू तेवढ्या त्या अधिक जवळच्या भासतात. "तू गेल्यावर" ही त्यातली माझी खुप आवडीची कविता.. "दोन अभंग" तर चक्क रोज मी मनात आळवत असतो. मला हे पुस्तक खूप जास्ती जवळचे आहे. मला वाटतं तुम्ही सर्वांनी देखील हे पुस्तक एकदा तरी नक्कीच वाचयला हवे. कवितांची बांधणी त्यात असणारे बारीक बारीक छटा आणि स्त्री चे सुंदर दर्शन हे बोरकरांच्या कवितेची खासियत यातून पाहायला मिळते. तत्वज्ञान आणि माणुसकीची एक प्रेमळ भावना यातून दिसते. माझ्या कायम जवळ असणाऱ्या या पुस्तकाबद्दल मी बोलेल तितकं कमीच आहे. मला हे आवडतं मी खूपदा वाचालही आहे. आता तुम्हीही वाचून नक्की सांगा... तुम्हाला हे पुस्तक कसं वाटतं आणि बोरकरांच्या कवितांनी तुम्हाला काय दिलं?
 
-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form